Welcome…

महाविद्यालयातील ग्रंथालय :-महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे मी सर्व ग्रंथालय सभासदांचे मन:पूर्वक स्वागत करते . उच्च शिक्षण प्रणालीचा आत्मा अस देखील ग्रंथालयास संबोधले जाते. महाविद्यालयाच्या समृध्द ग्रंथालयात अतिशय महत्वपूर्ण असे संदर्भ ग्रंथ , नियतकालिके तसेच अभ्यासक्रमावर आधारित पाठ्य पुस्तके उपलब्ध आहेत. समृध्द पारंपारिक ग्रंथ संपदे बरोबरच ग्रंथालयीन वाचकांसाठी 1,35,000 पेक्षा अधिक ई – बुक्स व 7000 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय ई – जर्नल्स देखील उपलब्ध आहेत. ग्रंथालयात पुस्तकांची देवाण घेवाण करण्यासाठी SOUL 2.0 या संगणक प्रणालीचा उपयोग केला जातो. तसेच ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती शोधण्यासाठी वाचन कक्षात OPAC (Online Public Access Catalogue) ची सुविधा देखील उपलब्ध आहे.

ग्रंथालयाच्या प्रमुख विभागा पैकी अतिशय महत्वाचा विभाग म्हणजे पुस्तक देवाण घेवाण विभाग आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाशी निगडीत पाठ्य पुस्तके आठ

दिवसांसाठी दिली जातात. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे सभासद होणे अनिवार्य आहे. ग्रंथालयाच्या वेबसाईट मधील Apply for Membership या लिंक मधून आपण

ग्रंथालयाचे एक वर्षासाठीचे सभासदत्व घेवू शकता. तसेच आपल्याला हवे असनाऱ्या पुस्तकाची नोंदणी आपण Advance Demand या ग्रंथालयाच्या वेबसाईट वरील लिंक मधून करू शकता. विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यासाठी वर्गनिहाय वेळा पत्रक तयार केले आहे. ग्रंथालयाच्या वेबसाईट मधील Book Circulation Time Table या लिंक

मधून आपण ग्रंथालयाचे पुस्तक वितरणाचे वेळा पत्रक पाहू शकता. सकाळी 09::30 ते 01:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवाण घेवाण केली जाते. (दुपारी 01:30 ते

02:30 हे मध्यंतराची वेळ असेल)  ग्रंथालयाचा दुसरा महत्वाचा विभाग म्हणजे ग्रंथदालन विभाग ज्या मध्ये ग्रंथालयातील पुस्तके हि विषयानुसार ठेवलेली आहेत. विद्यार्थ्यांनी या विभागात प्रवेश करतांना ग्रंथालयातील कर्मचार्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे तसेच ग्रंथदालनात प्रवेश करतांना स्वतः जवळील सामान , पिशवी बाहेर ठेवावे.

ग्रंथदालनात संदर्भ विभाग तसेच यु.जी.सी च्या उपक्रमा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अधिक माहितीसाठी Dr..Kulkarni Sir यांना भेटावे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके सदरील विभागात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचनकक्ष देखील ग्रंथालयाच आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाशी निगडीत पुस्तके वाचन कक्षात अध्ययनासठी उपलब्ध आहेत.

ग्रंथालय आपल्या वाचन विषयक तसेच अध्ययन विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून आपणास ग्रंथालयाच्या सेवांबद्दल काही तक्रार असल्यास आपण ग्रंथालयाच्या वेबसाईट मधील Online Complaints या लिंक मधून आपली तक्रार नोंदवू शकता अथवा ग्रंथपालाना समक्ष भेटून आपली तक्रार सांगू शकता.

Dr.Smt.Awchar Savita

ग्रंथपाल